शहर

मेट्रो मार्ग-३ स्थानकांवर आता तिकीटसाठी वायफाय सुविधा.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवेत दाखल झाली आहे. भुयारी मार्गिका असल्याने स्थानकांमध्ये काही मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क ठप्प होते. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढण्यास अडचण निर्माण होते. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मार्ग-३च्या सर्व स्थानकांवर मोबाईल ॲपद्वारे डिजिटल तिकीट खरेदी करण्यासाठी मोफत वायफाय

असे घेता येणार तिकीट

वाय-फायशी जोडण्यासाठी इंस्टॉल आणि लॉगिन: मेट्रोकनेक्ट ३ ॲप डाऊनलोड करून स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लॉगिन करा.

वाय-फायशी कनेक्ट करा मोबाईलच्या वायफाय सेटिंग्जमध्ये जाऊन

उपलब्ध नेटवर्कमधून मेट्रोकनेक्ट ३ निवडा.

ऍक्सेस सक्रिय कराः ॲप उघडून प्रोफाईल या विभागात जा त्यानंतर कनेक्ट टू वायफाय वर टॅप करा. त्यानंतर तिकीट बुकिंग सेवेचा लाभ घ्या.

सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही सुविधा सर्व स्थानकांच्या तिकीट खिडकीवर उपलब्ध आहे.

ही वायफाय सेवा मोफत, सुरक्षित आणि विश्वासार्ह असून नागरिकांनी तिकीट बुकिंगचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button